हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तालुक्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीची रणधुमाळी; २८ एप्रिलला मतदान

शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मंगळवार पासून नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात झाली असून २८ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत ४ सरपंच आणि १३ सदस्य पदांसाठी निवडणूक होणार असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली आहे.
तालुक्यात मृत्यू, राजीनामा, अनर्हता आदी कारणांमुळे ३१ जानेवारीअखेर रिक्त झालेल्या खर्दे बु., चांदसे-चांदसुर्या, तऱ्हाड कसबे आणि पनाखेड येथील सरपंच पदांसाठी थेट निवडणूक होणार आहे. तसेच अजनाड, टेंभेपाडा, निमझरी, लौकी, वाघाडी, तोंदे, नांथे, भोईटी, मांजरोद, उमर्दा, बुडकी, खर्दे खु. पाथर्डे या ग्रामपंचायतींमधील सदस्य पदांसाठी निवडणूक जाहीर झाली असून त्यासाठी मतदान होणार आहे.
इच्छुक उमेदवारांना ७ ते १३ एप्रिलदरम्यान (११ व १२ एप्रिल सुट्टी वगळून) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत शिरपूर तहसील कार्यालयात नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. केवळ विहित नमुन्यातील व स्वाक्षरी केलेले अर्जच ग्राह्य धरले जाणार आहेत.
१५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल, तर १७ एप्रिल दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
मतदानाची प्रक्रिया २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडणार असून २९ एप्रिल रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!