शिरपूर : येथील एच.आर.पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समता, न्याय, बंधुता व संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे हा होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एस. जे. पाटील होते. पर्यवेक्षक बी. बी. अग्रवाल उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
या सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये सामाजिक समतेविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा तसेच लघुनाट्य सादरीकरण यांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा विकास होऊन समाजाबद्दलची जाणीव अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमात वकृत्व स्पर्धेत रुचिता पाटील, मयुरी बडगुजर, दीपिका माळी, दिव्या वारुडे, युक्ती पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस.ठाकरे यांनी केले. कार्यक्रमास बी.एस.मोरे, मीना पटेल, एस.ए.जाधव, बी.आर.मोरे, स्वाती पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी संयोजन केले असून संपूर्ण सप्ताहात विविध उपक्रमांद्वारे सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.