धुळे : शिक्षण क्षेत्रात सातत्याने उत्कृष्टता सिद्ध करणाऱ्या एस.व्ही.के.एम. एन.एम.आय.एम.एस. ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या फार्मसी विभागाने यंदा जी-पॅट 2026 परीक्षेत अभिमानास्पद यश संपादन केले आहे. संस्थेच्या ३७ विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत यश मिळवत आपली गुणवत्ता अधोरेखित केली आहे.या निकालात संस्थेचा विद्यार्थी मयूर नेवाडकर याने ऑल इंडिया रँक १११ मिळवत अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे जुही जाधव हिने ऑल इंडिया रँक १८२, वैष्णवी सोनजे २०१, जोषिता जैन ४५९, वैष्णवी मोरे ४९३ मिळवत उत्कृष्ट यश मिळवले आहे. राष्ट्रीय स्तरावर एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद मानले जात आहे.या संस्थेतील इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये गौरव निकवाडे (ऑल इंडिया रँक ५१६), प्रीती भगत (६१४), हर्ष जैन (६७६), जान्हवी कवटे (१०६१), खुशबू शिंदे (१०९२), यशकुमार पाटील (१२३०), साक्षी भामरे (१३८६), तनय जैन (१६८९), मुहम्मद माझीन (१७६१),कोमल पाटील (१८५३), अमोल पवार (१८५६),धीरज शिंदे (१८७७),राजश्री वाघ (२०३३),मंदार पाटील (२१०२), हेतल कोळी (२४१९), प्राची बोरसे (२५०९),हितेश शिंदे (२७२२),भूषण वाघ (३१९४), सिद्धेश नवले (३६५०), ऋषिकेश रावल (३८०२),आदित्य शिंदे (३९६२), देवयानी विधाते (४०५१), खुशाल सोनवणे (४४८८),रामकृष्ण पाटील (४६७८),पल्लवी जपसरे (४७२३), अपूर्वा पाटील (४७४७),मुसाब चौहान (४८८०), साक्षी महाजन (५१०३), अश्विनी मोरे (५१८७), दुर्गेश पवार (११८५६), ऋषिकेश बडगुजर (११८६८) आणि हर्षल पवार (२२००३) यांचा समावेश आहे.
स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नोलॉजी मॅनेजमेंट विभागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले उच्च गुण आणि अखिल भारतीय स्तरावरील स्थान हे त्यांच्या कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचे फलित मानले जात आहे.
जी-पॅट ही परीक्षा फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी करिअरचा महत्त्वाचा टप्पा मानली जाते. या यशामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन तसेच औषधनिर्मिती, क्लिनिकल रिसर्च, फार्माकोव्हिजिलन्स, रेग्युलेटरी अफेअर्स अशा विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध होणार आहेत.
या यशामागे संस्थेचे प्राचार्य डॉ. समीर गोयल, डॉ. कार्तिक नखाते, डॉ. मोहम्मद उस्मान सिद्दीकी, डॉ. पवन गुप्ता आणि प्रा. साक्षी नळकांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मॉक टेस्ट, विषयवार मार्गदर्शन आणि वैयक्तिक शंका निरसन यावर भर देण्यात आला होता.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, चान्सलर स्नेहा अंकित पारिख, तसेच व्यवस्थापनातील सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
संस्थेच्या या यशामुळे भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर चमकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.