हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूर येथे अवकाळीचा तडाखा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत मागणी,आ.काशिराम पावरा यांनी दिले प्रशासनाला आदेश

शिरपूर : तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून भारतीय जनता पार्टी मार्फत शिरपूर प्रशासनाकडे नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी केली असून आ. काशिराम पावरा यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून तातडीने मदतीचे आदेश दिले आहेत.
गुरुवारी २ एप्रिल रोजी सायंकाळी वारा वादळासह पाऊस व गारपीटने शिरपूर शहरासह तालुक्यात हजेरी लावली. रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु असतांना अवकाळी पाऊस हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. काही ठिकाणी फळबागांना फटका बसला आहे.तर अहिल्यापूर परिसरात तासभर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे गावातील बैलजोडी मृत्यूमुखी पडली.
दरम्यान शुक्रवारी ३ एप्रिल रोजी शिरपूर तहसिलदारांना निवेदन देतेवेळी आ.काशिराम पावरा,  संग्रामसिंग राजपूत,भरत पाटील,श्यामकांत ईशी,  विरुपालसिंग राजपूत, बाळासाहेब पाटील,योगेंद्रसिंग सिसोदिया, खर्दे पाथर्डेचे सुनिल पाटील,पोलीस पाटील पंकज पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

तहसिलदारांनी निवेदनाची दखल घेऊन तलाठी व कृषी सहायकांना तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिलेत.

भारतीय हवामान विभागाने राज्यात विविध ठिकाणी पुढील तीन दिवसात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यात विविध ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!