हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूरात सब-ज्युनियर हँडबॉल राज्यस्तरीय स्पर्धेची दिमाखदार सुरुवात; जर्मनी संघामुळे रंगत वाढली

शिरपूर : श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ (एस.व्ही. के.एम.), मुंबईतर्फे आयोजित दुसऱ्या सब-ज्युनियर मुला-मुलींच्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेचे उद्घाटन तालुक्यातील तांडे येथील मुकेशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूलच्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात झाले. जर्मनीच्या ‘एमटीव्ही लुबेक’ संघाच्या सहभागामुळे स्पर्धेला आंतरराष्ट्रीय रंगत लाभली आहे.
एस.व्ही.के.एम. अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी स्व. मुकेशभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि बलून सोडून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संचलनाने उपस्थितांची दाद मिळवली.
या स्पर्धेत राज्यभरातील २३ संघ सहभागी झाले असून, मुलांचे १३ आणि मुलींचे १० संघ मैदानात उतरले आहेत. मुंबई, सांगली, ठाणे, नागपूर, रायगड, पुणे, नंदुरबार, लातूर आदी भागांतील संघांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेत खेळाडू जोशपूर्ण खेळाचे दर्शन घडवत असून क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरलेला जर्मनीचा ‘एमटीव्ही लुबेक’ संघ स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाची अनुभूती देत आहे. जागतिक पातळीवरील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
उद्घाटन सोहळ्यास एन.एम.आय.एम.एस. शिरपूर कॅम्पसच्या प्रभारी रीटा पटेल, जर्मन प्रशिक्षक आर्न्ड ब्लेकर्ट व मार्को पिश्के, तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रशिक्षक, पंच आणि क्रीडा पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. किरण अंचन यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!