हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मध्य प्रदेशातील दरोडेखोरांना शिरपूर पोलिसांनी जेरबंद केले

शिरपूर : मध्य प्रदेशातील सेंधवा येथील ‘फ्लोअर इंडस्ट्रीज’ कारखान्यात दरोडा टाकून फरार झालेल्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात शिरपूर शहर पोलिसांना यश आले आहे. धुळे जिल्हा पोलिसांच्या समन्वयातून झालेल्या या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे १९ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईत संशयीत फिरोज सय्यद,विशाल दामोदरे, रमेश करडे, श्याम साळुंखे आणि संतोष शिवरकर यांना अटक करण्यात आली.                                    मिळालेल्या माहितीनुसार ३ मार्च रोजी पहाटे सेंधवा येथे कारखान्याच्या वॉचमनला मारहाण करून लूटमार करण्यात आली होती. त्यानंतर संशयीत वाहनासह फरार झाले.या घटनेची माहिती मिळताच शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व शहर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी पथकासह महामार्गावर तातडीने नाकाबंदी केली.दरम्यान तालुका पोलिसांच्या नजरेतून सुटलेल्या संशयीत वाहनांचा शहर पोलिसांनी पाठलाग करत चोरीच्या सियाझ कारसह फिरोज सय्यद याला ताब्यात घेतले. दरम्यान, लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधील इतर संशयीतांनी पोलिसांना चकवा देत सावळदे गावाच्या दिशेने पळ काढला तापी नदीकाठापर्यंतss थरारक पाठलाग रंगला.या वेळी सावळदे, कुरखळी व थाळनेर येथील ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य केले. त्यांच्या मदतीने विशाल दामोदरे, रमेश करडे, श्याम साळुंखे आणि संतोष शिवरकर या उर्वरित संशयोतांना ताब्यात घेण्यात आले.या कारवाईत दोन कार, ३७ किलो सुगंधी तेल, पाच मोबाईल फोन, चंदनासह निंबाचे लाकूड व रोख रक्कम असा एकूण १९ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शिरपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि ग्रामस्थांच्या सजगतेमुळे आंतरराज्यीय टोळीचा डाव उधळला गेला असून या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलीस अधीक्षक देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी,पीएसआय संदिप दरवडे, पोहेकॉ राजेंद्र रोकडे,रविंद्र आखडमल, पोकॉ योगेश दाभाडे,विनोद आखडमल, गोविंद कोळी,भटू साळुंखे,मनोज दाभाडे,प्रशांत पवार,मनोज महाजन, सचीन वाघ,विजय पाटील आदींनी केली

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!