हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शहरातील क्रांतीनगर रस्त्यावर अपघात,२५ वर्षीय युवकाचा मृत्यू

शिरपूर शहरातील क्रांतीनगर रस्त्यावर भोलेनाथ पेट्रोल पंप समोर 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी दुचाकी घसरून डिव्हायडरवर धडकल्याने भीषण अपघात झाल्याने शिंगावे शिवारातील तिरुपती नगर मधील २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हरीश दिगंबर झांजरे रा.शिंगावे ता.शिरपूर असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हरीश हा युवक शहरातील एका दुकानावर कामाला होता.दरम्यान तो सायंकाळी साडे 5/6 वाजेच्या सुमारास घरी जात असतांना अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी डिव्हायडरला धडकली.त्यात हरीशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तात्काळ नागरीकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास संबंधित पोलिसांकडून सुरू आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!