सातारा जिल्ह्यात सराफा कुरियरवर दरोडा टाकून 22 तोळे सोने लुटून पळालेल्या पाच दरोडेखोरांना शिरपूर शहर पोलिसांनी थरारक पाठलाग करून अटक केली आहे.अभिषेक सुरेंद्र शिकलबार वय 19,अंकुश जाट वय 19,अनुज रामाधर दिवाकर वय 19,,पंकज केदार राठोड वय 19 अजय फौजदा राठोड वय 21 सर्व रा. गोलेगा मंदिर, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.


सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलीस अधीक्षक देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी,पीएसआय संदिप दरवडे, पोहेकॉ राजेंद्र रोकडे,रविंद्र आखडमल, पोकॉ योगेश दाभाडे,विनोद आखडमल, गोविंद कोळी,भटू साळुंखे,मनोज दाभाडे,प्रशांत पवार,मनोज महाजन, सचीन वाघ,विजय पाटील आदींनी केली