हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरांचे शिरपूर तालुक्यात आयोजन

शिरपूर ;- ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच विविध घटकांच्या समस्या थेट ऐकून त्वरित निराकरण करण्याच्या उद्देशाने महसूल विभागामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शिरपूर तालुक्यात मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून शासन निर्णयानुसार त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

तालुक्यातील अर्थे मंडळ-११ मार्च,थाळनेर मंडळ- १२ मार्च,कोडीद मंडळ-१४ मार्च,जवखेडा मंडळ-१८ मार्च,  गिधाडे मंडळ-२४ मार्च,बोराडी मंडळ -८ एप्रिल,सांगवी मंडळ-१० एप्रिल,दहीवद मंडळ-१५ एप्रिल,करवंद मंडळ-१७ एप्रिल,शिरपूर मंडळ-८ एप्रिल,होळनांथे मंडळ-१५ एप्रिल २०२५  या मंडळांमध्ये मंडळस्तरावर शिबिरे घेतली जाणार आहेत. या शिबिरांमध्ये शासन निर्णयांचे वाचन व जनजागृती, प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, सामाजिक अर्थसहाय्य योजनांतील प्रकरणांची छाननी व लाभ मंजुरी आदेशांचे वाटप करण्यात येणार आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप, शेतकऱ्यांना जमीन नोंदी व पीक नुकसान, पीएम किसान, अन्नसुरक्षा योजना आदींबाबत मार्गदर्शन व तक्रार निवारण करण्यात येणार असून अग्रीस्टॅक नोंदणी देखील केली जाणार आहे.
दरम्यान २५ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे सर्व तालुकास्तरीय विविध विभागांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रकरणांची अद्ययावत यादी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासन निर्णयानुसार सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून शिबिरे यशस्वी करण्यासाठी आवश्यक तयारी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तरी शिरपूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी या महसूल समाधान शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने तहसीलदारांनी केले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!