हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मांडळ शिवार येथे कनकेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

शिरपूर (प्रतिनिधी) मांडळ शिवार येथील श्री कनकेश्वर महादेव मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत वेदघोष, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींच्या साक्षीने मंदिरात महादेवाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती जनक भाई पटेल, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, नगरसेवक वासुदेव देवरे, पंचायत समिती सदस्य यतिश सोनवणे, नगरसेवक विनायक कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पूजा-अर्चा व विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात गणेशपूजनाने झाली. त्यानंतर अभिषेक, हवन, कलशारोहण व महाआरतीचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.
मंदिर उभारणीसाठी विविध दात्यांनी उदारपणे देणगी देत सहकार्य केले. त्यांच्या योगदानामुळे मंदिराचे भव्य व आकर्षक बांधकाम पूर्णत्वास गेले. याबद्दल सर्व दात्यांचे आयोजकांकडून विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमानिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. गावातील युवक, महिला मंडळ व ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
मांडळ शिवार परिसरात उभारण्यात आलेले हे कनकेश्वर महादेव मंदिर भविष्यात धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे केंद्र ठरणार असून ग्रामस्थांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमाचे आयोजन साई प्रसाद कॉलनीतील नागरिक व मित्र मंडळांनी सहकार्य केले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!