हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शाळेला ‘शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा’ सन 2025-26 च्या बाह्य मूल्यांकनात ‘अ’ प्लस श्रेणी प्राप्त

शिरपूर : आर. सी. पटेल इंग्रजी प्राथमिक शाळेने शैक्षणिक गुणवत्तेच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत सन 2025-26 च्या ‘शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा’ (स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क) अंतर्गत बाह्य मूल्यांकनात अ प्लस श्रेणी प्राप्त केली आहे. ही माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या अधिकृत पत्राद्वारे जाहीर करण्यात आली आहे.
सदर पत्रानुसार, राज्यातील शाळांचे मूल्यमापन शासन निर्णयानुसार टप्प्याटप्प्याने करण्यात आले. सन 2024-25 मध्ये पूर्वतयारी पूर्ण केलेल्या शाळांपैकी सन 2025-26 मध्ये निवडलेल्या शाळांचे बाह्य मूल्यांकन करण्यात आले. या प्रक्रियेत राज्यभरातील हजारो शाळांचा समावेश होता. त्यापैकी पात्र ठरलेल्या शाळांमध्ये आर.सी.पटेल इंग्रजी प्राथमिक शाळेचा समावेश असून शाळेला अ प्लस श्रेणी बहाल करण्यात आली आहे.
 मूल्यमापन प्रक्रियेत शाळेचे शैक्षणिक नियोजन, अध्यापन-अभ्यासक्रम अंमलबजावणी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शालेय व्यवस्थापन, सुरक्षित व स्वच्छ वातावरण, शैक्षणिक नोंदी, पालक सहभाग तसेच गुणवत्ता वृद्धीसाठी केलेले उपक्रम यांचा सखोल आढावा घेण्यात आला.बाह्य मूल्यांकन समितीने प्रत्यक्ष शाळा भेट, कागदपत्रांची पडताळणी व विविध घटकांवरील गुणांकनाच्या आधारे ही श्रेणी निश्चित केली. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, अ प्लस श्रेणी प्राप्त करणाऱ्या शाळांची यादी जाहीर करण्यात आली असून संबंधित शाळांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच इतर शाळांनीही गुणवत्ता वृद्धीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्याध्यापक हेमंतकुमार देवरे यांनी सांगितले की, शाळेला प्राप्त झालेली ही अ प्लस श्रेणी म्हणजे शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाचे फलित आहे. गुणवत्ता टिकवून ठेवत पुढील काळात अधिक उत्कृष्ट कामगिरी करण्याचा आमचा संकल्प आहे.
या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव सौ. रेषा पटेल, सर्व ट्रस्टी, सीईओ डॉ. उमेश शर्मा, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी आनंद व्यक्त केला असून, शहरातील शैक्षणिक क्षेत्रात या कामगिरीचे कौतुक होत आहे.
गुणवत्ता आश्वासनाच्या दृष्टीने शाळेने केलेले कार्य इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या उल्लेखनीय यशामुळे शाळेचे नाव शैक्षणिक क्षेत्रात अधिक उजळले असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या वाटचालीला नवे बळ मिळाले आहे. अ प्लस श्रेणी ही केवळ सन्मानाची बाब नसून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेल्या कटिबद्ध प्रयत्नांची पावती आहे.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!