हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

भाऊबंधकीच्या वादात साखरपुड्याच्या मंडपात तिघांची निर्घृण हत्या,पिंपळनेर रक्तरंजित

साक्री (प्रतिनिधी) – पिंपळनेर येथे साखरपुड्याच्या मंडपात भाऊबंदकीच्या वादातून झालेल्या भीषण मारामारीत तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

घटनेनंतर संशयितांनी गुजरातच्या दिशेने पलायन करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी सीमाभागात पाठलाग करून त्यांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार,गोसावी समाजातील साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना लग्न पत्रिकेतील नावावरून या किरकोळ कारणावरून भाऊबंधकीच्या दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद चिघळत जाऊन हाणामारीत रूपांतरित झाला. या घटनेत सुरेश गोसावी (५०), साहिल गोसावी (३५) आणि देवेंद्र पवार (३६) यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर संशयित ब्रेझा कारमधून गुजरातकडे पळून जात होते. याची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत ओटाबरी घाट परिसरात वाहन क्रमांकाच्या आधारे अडथळा निर्माण केला. स्थानिकांच्या मदतीने कार अडवण्यात यश आले.या कारवाईत कांतीलाल गोसावी (४२), जसवंत गोसावी (३६) तसेच चालकाला ताब्यात घेण्यात आले. तिघेही सोनगड येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!