शिरपूर : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ आमदार कार्यालय शिरपूर येथे भारतीय जनता पार्टी तर्फे 16 फेब्रुवारी रोजी जाहीर निषेध करण्यात आला.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. तर याप्रकरणी त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपाचे संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी केली.
माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल,आ.काशिराम दादा पावरा,माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल, थाळनेर मंडळ अध्यक्ष विरूपालसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.या प्रसंगी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, बाजार समिती सभापती के. डी. पाटील, नरेंद्रसिंग सिसोदिया, पिंटू शिरसाठ, शामकांत ईशी, बाबुलाल महाजन , राज सिसोदिया, पिंटू माळी, हर्षल गिरासे, भालेराव माळी, राकेश पाटील, राज भोई, चंद्रकांत पाटील, बाबा गोसावी, भाजपा पदाधिकारी योगेंद्रसिंग सिसोदिया, अजिंक्य शिरसाठ, नरेंद्र पाटील, संजय जाधव, भाजयुमो तालुकाध्यक्ष संदीप कुवर, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप माळी, करण शिंदे, किशोर माळी, अरुण धोबी, लाला गिरासे, महेंद्र पाटील, जयसिंग राजपूत, संजय माळी, राजू चौधरी, विजय खैरनार, राजेंद्र चौधरी, शिरीष पाटील, राहुल माळी, संजय आसापुरे, पप्पू चौधरी, राजेश शिवदे, किशोर चव्हाण, राधेश्याम भोई, महेंद्र पाटील, पंकज माळी, प्रतिक चौधरी, दीपक पगारे, विजय राजपूत तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.