हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

श्री. संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त शिरपुरात कार्यक्रम संपन्न

शिरपर – श्री. संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त शिरपुरात कार्यक्रम संपन्न झाला. यावेऴी आ. काशिराम पावरा, धुऴे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी व माजी नगर सेवक हेमंत पाटील यांनी उपस्थित राहुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच उपस्थित बंजारा समाजातील बंधू-भगिनींना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात. यावेळी आ. काशिराम पावरा म्हणालेत की, श्री. संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो, समाजात समता, बंधुता, सेवा आणि सत्याचा मार्ग दाखवून त्यांनी संपूर्ण समाजाला एकतेचा आणि संस्कारांचा अमूल्य संदेश दिला. त्यांच्या विचारांमुळे व कार्यामुळे समाजाला नवी दिशा आणि आत्मविश्वास मिळाला. श्री संत सेवालाल महाराज यांचे जीवनकार्य हे समाजसेवा, त्याग आणि मानवतेचे प्रेरणास्थान आहे. असे सांगितले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव चौधरी यांनी आपल्या भाषणात म्हणालेत की, संत सेवालाल महाराजांनी दिलेला समाजएकतेचा, सत्याचा आणि सेवाभावाचा संदेश आपण सर्वांनी आचरणात आणूया, हीच खरी त्यांना अभिवादनाची भावना ठरेल. असे सांगितले. यावेळी बंजारा समाजाचे बंधू भगिनी विविध श्रेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!