हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

धुळे जिल्हा संघ घोषित; शिरपूरचा आनंद जगताप कर्णधार,तर धुळ्याचा रोनक पाटील उपकर्णधार

शिरपूर : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित खुल्या गटाची दोनदिवसीय आमंत्रित क्रिकेट स्पर्धा १६ फेब्रुवारी ते ३ मार्चदरम्यान पुण्यात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी धुळे जिल्हा क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला असून कर्णधारपदी शिरपूरच्या आनंद जगताप तर उपकर्णधारपदी धुळ्याच्या रोनक पाटील यांची निवड झाली आहे.
धुळे संघाचा समावेश अव्वल ‘अ’ गटात असून बीड जिल्हा, जेट्स इलेव्हन पुणे, रिकरेशन क्रिकेट क्लब पुणे, स्पोर्ट्समन क्रिकेट क्लब पुणे व झोराष्ट्रीयन क्रिकेट क्लब पुणे यांच्यासह सामना होणार आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे प्रतिष्ठेच्या रणजी करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवडीची संधी मिळणार असल्याने स्पर्धेला विशेष महत्त्व आहे.
संघाला प्रशिक्षक फिरोज शेख यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. अलीकडेच झालेल्या महा टी-२० स्पर्धेत चार विजयांची नोंद केल्यानंतर धुळे संघाकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी संघाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!