हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

महादेव दोंदवाडा येथे गांजा शेतीवर पोलिसांचा छापा; ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

शिरपूर (प्रतिनिधी): शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा शिवारात प्रतिबंधित गांजाच्या शेतीवर पोलिसांनी धडक छापा टाकून तब्बल ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत महादेव दोंदवाडा येथील शेतात गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून तालुक्यातील महादेव दोंदवाडा गावशिवारात संशयीत राशा समदा पावरा वय ५०, रा. महादेव दोंदवाडा, ता. शिरपूर, जि. धुळे) यांच्या कसत असलेल्या शेतात छापा टाकण्यात आला।सदर शेतात फुले व बोंडे असलेली गांजाची झाडे लागवड केल्याचे आढळून आली.
कारवाईदरम्यान अंदाजे ४१ लाख रुपये किमतीचा सुमारे ८२० किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला.असून संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि जयपाल हिरे करीत आहेत.घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी भेट देत पाहणी करून मार्गदर्शन करीत सूचना दिल्या.      सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,पीएसआय सुनिल वसावे, पोहेकॉ संतोष पाटील, जाकीरोद्दीन शेख,जगन्नाथ कोळी, पोहेकॉ राजु ढिसले, विजय ढिवरे,स्वप्नील बांगर,दिनकर पवार,वाला पुरोहित,कृष्णा पावरा व चापोहेकॉ अल्ताफ बेग मिर्झा, इसरार फारुकी अशांनी केली आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!