हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश; दोन हायवा डंपरसह कार जप्त, चौघांना अटक

शिरपूर शहरातील दोन मालवाहतूक हायवा डंपर चोरीप्रकरणी शिरपूर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले दोन्ही हायवा डंपर तसेच गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.
करवंद नाका येथील एच.पी. पेट्रोल पंपासमोरून MH-18 BZ 5114 क्रमांकाचा हायवा तसेच शिरपूर-शहादा रोडवरील पटेल सर्विस सेंटरसमोरून MH-18 BH 1718 क्रमांकाचा दुसरा हायवा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि फास्टटॅगची माहिती तपासली. पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रवींद्र आखडमल व डीबी पथकाने घटनास्थळ व परिसरातील कॅमेऱ्यांची बारकाईने पडताळणी केली. तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाचा वेग वाढविण्यात आला.
या तपासात महावीरप्रसाद भवरलालजी शर्मा (रा. भिलवाडा, राजस्थान), इरफान उस्मान मेव (रा. नुह, हरियाणा), नियामत दिनू मेव (रा. पलवल, हरियाणा) व कालू गफुरखों मेव (रा. भिलवाडा, राजस्थान) यांनी संगनमताने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. संशयितांनी HR-52G-7875 क्रमांकाच्या मारुती सुझुकी बलेनो कारचा वापर करून चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी राजस्थान राज्यातील भिलवाडा येथे दोन पंचांसमक्ष कारवाई करत दोन्ही हायवा डंपर व संबंधित कार जप्त केली. त्यानंतर चारही संशयितांना मुद्देमालासह शिरपूर येथे आणून अटक करण्यात आली.संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ रवींद्र आखडमल करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.श्री अजय देवरे,शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि किशोरकुमार परदेशी, पोहेकॉ रविंद्र आखडमल. गोविंद कोळी, विनोद आखडमल, आरिफ तडवी, प्रशांत पवार भटु साळुंके, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे,सचीन वाघ यांच्या पथकाने केली आहे.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!