हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

वाघाडी टी-पॉईंटवर भीषण अपघात; ट्रॅक्टरने दिली अपेरिक्षाला धडक,4 जण जखमी

शिरपूर : शहरातील शिरपूर-शहादा मार्गावरील वाघाडी टी-पॉईंट येथे गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनीसह चार जण गंभीर जखमी झाले. भरधाव वेगाने येणाऱ्या बोरवेल ट्रॅक्टरने अपेरिक्षाला जोरदार धडक दिल्याने अपेरिक्षाचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघाडीहून शिरपूरकडे येणाऱ्या बोरवेल ट्रॅक्टरने टी-पॉईंटवरून जात असलेल्या अपेरिक्षाला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचा पुढील भाग अपेरिक्षाच्या पुढील फ्रेममधून आत घुसत मागील बाजूपर्यंत गेला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
या अपघातात वाघाडी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी नेहा संतोष ठाकूर (वय १८), अपेरिक्षा चालक आशिफ युनूस मण्यार, कमलबाई सेना पवार (वय ६६) व शांताबाई सुदाम निकम (वय ६५) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, वाघाडी टी-पॉईंटवर वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, येथे वेगमर्यादा फलक, स्पीड ब्रेकर, सिग्नल किंवा इशारा चिन्हे बसवून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!