शिरपूर (प्रतिनिधी):
समाजभूषण, शिरपूर सुवर्ण नगरीचे माजी नगराध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक तसेच क. ब. चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य आणि गोरगरिबांचे मसिहा म्हणून ओळख असलेले स्व. रावसाहेब प्रभाकरराव चव्हाण यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या निवासस्थानी विनम्र अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी स्व. रावसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्याचा उपस्थितांनी गौरव केला. स्व. चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात शिरपूरच्या विकासासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी मोलाचे योगदान दिले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या श्रद्धांजली कार्यक्रमास श्रीमती प्रमिलाताई प्रभाकरराव चव्हाण, नगर परिषद शिक्षण समितीचे सभापती शामकांत ईशी, नगर परिषद बांधकाम समितीचे सभापती वासुदेव देवरे, नगरसेवक इरफान मिर्झा, बारकू आबा पाटील, जगदीश सोनगडे, देविदास माळी, प्रविण चव्हाण, कल्याण माळी, सुरेश आहिरे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.