हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

नवीन बांधकामातून विद्युत साहित्य चोरी,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरपूर : शहरातील वरझडी रोडवरील पाणी फिल्टर प्लांटच्या मागे सुरू असलेल्या नवीन घराच्या बांधकाम स्थळावरून अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार ७५ रुपये किमतीची इलेक्ट्रिक विद्युत साहित्य लांबवल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर चोरीची घटना ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ या कालावधीत घडली आहे. ततालुक्यातील जातोडा येथील जितेंद्र गुलाबसिंग गिरासे यांचे वरझडी रस्त्यावरील पाणी फिल्टर प्लांटच्या मागे असलेल्या ले-आऊट नं. ३१ मधील प्लॉट नं. ३० वरील नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. या घरात अज्ञात चोरट्यांनी विनापरवनगीने व विणसंमतीने घरात प्रवेश करून घरात ठेवलेले ९० मीटरची इलेक्ट्रिक वायरचे १७ खोके तसेच घरात फिटिंग केलेली सुमारे ४०० मीटर वायर असे सुमारे ५५ हजार ७५ रुपये किमतीची इलेक्ट्रिक वायर चोरून नेली.
याप्रकरणी जितेंद्र गुलाबसिंग गिरासे यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.दाखल फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोहेकॉ रविंद्र आखडमल करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!