शिरपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी फरार झालेल्या आरोपीला शिरपूर तालुका पोलिसांनी गुप्त बातमीच्या आधारे अटक केली. पमा झिंगाड्या पवार (रा. प्रधानदेवी, ता. शिरपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना ३० जानेवारी २०२६ रोजी रात्री आठ ते नऊच्या सुमारास संशयिताने पत्नीला घराजवळील नाल्यात मारहाण केली.
या प्रकरणी जखमी महिलेचा भाऊ आशाराम भायला सेनानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता (CCTNS गु.र. नं. २१/२०२६).गुन्ह्यानंतर संशयीत फरार झाला होता. पोलिसांचा शोध चुकवण्यासाठी त्याने मोबाईल बंद ठेवल्याने तपासात अडथळे येत होते. दरम्यान, ९ फेब्रुवारी रोजी संशयीत कपडे व साहित्य घेण्यासाठी प्रधानदेवी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे व गुन्हे शोध पथकाने सापळा रचून सकाळी साडेअकराच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेतले.पोलिस चौकशीत त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने तिला लाकडी दांडक्याने डोक्यावर व हातापायांवर मारहाण केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,पीएसआय मनोज कचरे,सुनिल वसावे,मिलींद पवार,पोहेकॉ संतोष पाटील, संदिप ठाकरे, पोकॉ भुषण पाटील,योगेश मोरे, संजय भोई, सुनिल पवार,स्वप्निल बांगर,विजय ढिवरे, गुरदास बडगुजर,मनोज नेरकर,कृष्णा पावरा,चापोहेकॉ अल्ताफ मिर्झा, गिरधर पाटील अशांनी केली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत.