हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

बोराडीत महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमुळे ग्रामपंचायतीची ‘दामिनी पथक’ नेमणुकीची मागणी

शिरपूर/- तालुक्यातील बोराडी गाव व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून महिला व शालेय विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बोराडी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक, धुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरपूर तसेच शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन तात्काळ ‘दामिनी पथक’ नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,गावातील मुख्य रस्ते, शाळा व महाविद्यालय परिसरात काही तरुण बिनधास्तपणे वावरत असून शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत विद्यार्थिनींची छेड काढण्याचे प्रकार घडत आहेत.विनापरवाना दुचाकी चालवणे,कर्णकर्कश सायलेन्सरचा आवाज करून वेगाने वाहन चालवणे, यामुळे अपघातांचीही भीती निर्माण झाली आहे. परिणामी,मुलींमध्ये भीतीचे वातावरण असून शालेय शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर बोराडी व परिसरात तात्काळ ‘दामिनी पथक’ नियुक्त करावे,शाळा व महाविद्यालयीन वेळेत पोलिसांची विशेष गस्त वाढवावी, तसेच विनापरवाना व आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशा मागण्या ग्रामपंचायतीने केल्या आहेत. महिलांची सुरक्षितता व गावातील सामाजिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!