हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

खंडेराव महाराज यात्रेत दंगलप्रकरणी अटक केलेल्या सहा संशयितांची पोलिसांकडून शहरातून दिंड

शिरपूर : शिरपूर शहरातील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवात दुकाने लावण्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या दंगलीप्रकरणी दाखल गुन्ह्यातील एकूण १८ आरोपींपैकी अटक करण्यात आलेल्या सहा संशयितांची पोलिसांनी मंगळवारी शहरातून दिंड काढली. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत ही कारवाई करण्यात आली.
यात्रोत्सव काळात दुकानांच्या जागेवरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून तपासादरम्यान सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण व्हावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने पोलिस प्रशासनाने संशयितांची शहरातून दिंड काढली.
विशेष म्हणजे यापूर्वी मागील यात्रोत्सवातही याच संशयितांची अशाच प्रकारे दिंड काढण्यात आली होती. वारंवार कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका कायम ठेवण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, दंगल व अनुचित प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
या कारवाईदरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उर्वरित संशयितांचा शोध सुरू असून तपास अधिक गतीने सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!