शिरपूर : अस्तित्व सोशल वेल्फेअर फाउंडेशन मार्फत बोराडी येथील द्वेता स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे महिलांसाठी “कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण” या विषयावर जनजागृती व मार्गदर्शन शिबिर नुकतेच संपन्न झाले.

या कार्यक्रमात ॲड.सौ.जयश्री पंचभाई (पावरा) यांनी महिलांना कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५ (प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक वायोलन्स ॲक्ट, 2005) संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, शारीरिक, मानसिक, लैंगिक, आर्थिक तसेच भावनिक छळ हाही कौटुंबिक हिंसाचाराच्या व्याख्येत येतो. महिलांना या कायद्यानुसार संरक्षण आदेश, निवासाचा हक्क, आर्थिक मदत, वैद्यकीय सुविधा तसेच मुलांचा ताबा मिळण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पीडित महिलांनी पोलीस ठाणे, संरक्षण अधिकारी, महिला आयोग, न्यायालय किंवा हेल्पलाईनच्या माध्यमातून तक्रार कशी नोंदवावी, याची सविस्तर माहिती देण्यात आली. महिलांनी अन्याय सहन न करता आपल्या हक्कांसाठी पुढे यावे, शासनाने महिलांच्या संरक्षणासाठी विविध कायदे व योजना उपलब्ध करून दिल्या असून त्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन ॲड. पंचभाई यांनी केले.
या कार्यक्रमास माजी जि.प.सदस्य सौ.जताबाई रमण पावरा,माजी पं.स.सदस्य सौ.सरिता विशाल पावरा, अस्तित्व सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या समन्वयिका सौ.सोनिया भसीन, ग्रा.पं.सदस्य मयुरी सुरेंद्रसिंग पावरा,सौ.संगीता सोनार तसेच अस्तित्व टीमचे सर्व सदस्य उपस्थित होते.या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे महिलांमध्ये कायदेशीर जागरूकता वाढून आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली.