हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

भारत-अमेरिका व्यापार करार शेतकऱ्यांसाठी घातक; अन्यथा आंदोलन-किसान सभेचा इशारा

शिरपूर: भारत आणि अमेरिका यांच्यात झालेला व्यापार करार भारतीय शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा असून, केंद्र सरकारने देशातील शेती क्षेत्र जागतिक व्यापाऱ्यांच्या दावणीला बांधले आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. हिरालाल परदेशी यांनी केला आहे. या करारातील शेतीविषयक जाचक अटी तातडीने रद्द न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला.
शेती हा विषय आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या कक्षेबाहेर ठेवण्याचे भारताचे पारंपरिक धोरण भाजप सरकारने पायदळी तुडवले आहे, असे नमूद करत अ‍ॅड. परदेशी म्हणाले की, अमेरिकन सरकार तेथील शेतीला प्रचंड अनुदान देते. त्यामुळे अमेरिकेतील मका, सोयाबीन, बदाम व पिस्ता यांसारखी उत्पादने विनाशुल्क किंवा अत्यल्प शुल्कात भारतीय बाजारात दाखल झाल्यास देशातील शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारे भाव मोठ्या प्रमाणात कोसळतील.
कराराअंतर्गत अमेरिकन दुग्धजन्य पदार्थांसाठी बाजारपेठ खुली केल्यास ग्रामीण भागातील जोडधंदा असलेला दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. तसेच, अमेरिकेत पिकवला जाणारा मका व सोयाबीन यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनुकीय बदल केलेले असल्याने अशा बियाण्यांचा भारतात शिरकाव झाल्यास पर्यावरण व मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतील, असा इशाराही त्यांनी दिला.
केंद्र सरकारने या व्यापार करारातील शेतीविषयक अन्यायकारक अटी तातडीने मागे घ्याव्यात; अन्यथा महाराष्ट्र राज्य किसान सभा राज्यभर आंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशारा अ‍ॅड. हिरालाल परदेशी यांनी दिला आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!