हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

खंडेराव यात्रेत दुकानाच्या कारणावरून राडा,कु-हाड,तलवार,काठ्यांचा ससर्रास वापर; १८ जणांविरुद्ध गुन्हा

शिरपूर : शिरपूर शहरातील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवात खेळण्यांची दुकाने लावण्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता. ५) सायंकाळी खंडोबा मंदिर शेजारील मच्छीबाजार परिसरात घडली. या घटनेत कु-हाड, तलवार व लाकडी काठ्यांचा वापर करण्यात आल्याने अनेक जण जखमी झाले. प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या तक्रारीनुसार १८ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री खंडेराव महाराज यात्रेनिमित्त मच्छीबाजार परिसरात खेळण्यांची दुकाने लावण्यात आली होती. याच ठिकाणी दुकानाच्या जागेवरून वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. एका गटाने कु-हाड घेऊन हल्ला केल्याने प्रदीप मनोज भिल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर इतरांनी काठ्यांनी मारहाण केल्याने हात, पाय व पाठीवर जखमा झाल्या. भांडणादरम्यान आरोपींनी हातात शस्त्रे घेऊन परिसरातील दुकाने बळजबरीने बंद पाडत दहशत निर्माण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसऱ्या गटाकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतही परस्परविरोधी आरोप करण्यात आले आहेत. आपल्यावर कु-हाड, तलवार व लाकडी दांडक्यांनी प्राणघातक हल्ला झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात रविंद्र आधार सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर शिरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इतर जखमींनाही उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटांच्या तक्रारींची दखल घेत दंगल, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव, शस्त्रांचा वापर व सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणे आदी विविध कलमान्वये एकूण १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पीएसआय संदीप दरवडे व पीएसआय कुशारे करीत आहेत.
या घटनेमुळे यात्रोत्सवाच्या काळात परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मच्छीबाजार व मंदिर परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!