हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपुरात संत गुरू रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती उत्साहात साजरी

शिरपूर (प्रतिनिधी) :
संत रविदास नगर, शिरपूर येथे चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास शिरपूर तालुक्याचे आमदार मा. काशिराम पावरा तसेच शिरपूर तालुक्याचे आरोग्यदूत, नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक भुपेशभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी ११ वाजता खालचे गाव येथील संत रविदास समाज मंदिर हॉलमध्ये संत गुरू रविदास महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यानंतर सायंकाळी ७ वाजता प्रभागातील नगरसेवक व पाणीपुरवठा सभापती गणेश सावळे यांच्या वतीने भक्ती, समता व मानवमूल्यांचा संदेश देणारा भव्य समाज प्रबोधनपर कार्यक्रम व भीमगीतांचा आयोजन करण्यात आले.
यावेळी आमदार काशिराम पावरा, नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नवनिर्वाचित नगरसेवक, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष राजगोपाल भंडारी, के.व्ही.पी. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, उपाध्यक्षा संगिता देवरे, पाणीपुरवठा सभापती गणेश सावळे, शिक्षण व क्रीडा सभापती शामकांत ईशी, नगरसेविका वर्षा रविंद्र (पिटू) माळी यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच समाजातील महिला भगिनी व समाजबांधवांची लक्षणीय उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सुरेश अहिरे,दिनेश सावळे, दीपक अहिरे, बैसाणे सर व आल्टीमेट डान्स ग्रुप यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम शांततेत, उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!