हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

गधडदेव शिवारात बनावट देशी दारू कारखाना उध्दवस्त

शिरपूर (प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील गधडदेव शिवारातील आंबाडूकपाडा येथे सुरू असलेल्या बनावट देशी दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ रोजी धडक कारवाई करत सुमारे ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारखाना चालविणारा संशयित कारवाईची चाहूल लागताच फरार झाला असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आंबाडूकपाडा परिसरात बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बी. व्ही. हिप्परगेकर यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे १ रोजी पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. मात्र पथक येत असल्याची चाहूल लागताच कारखान्यातील संशयित पसार झाला.
छाप्यात पथकाने झोपडीची झडती घेतली असता बनावट देशी दारूच्या ४,५०० सिलबंद बाटल्या (४५ खोके), देशी दारू ‘टँगो पंच’च्या ३,००० सिलबंद बाटल्या (३० खोके), ३५ लिटर क्षमतेचे ७ प्लास्टिक कॅन, २४५ लिटर तयार बनावटीची देशी दारू तसेच १२ हजार रिकाम्या बाटल्या असा एकूण ५ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बी. व्ही. हिप्परगेकर, हाडाखेड तपासणी नाक्याचे निरीक्षक देविदास नेहूल, एस. पी. मते यांच्यासह जवान हेमंत पाटील, काशिनाथ गोसावी, प्रतीकेश भामरे, एम. पी. म्हस्के, दीपक अहिरराव, बाळकृष्ण सोनवणे, कल्पेश शेलार, मनोज धुळेकर, सुरेश शिरसाळे, रवींद्र देसले, निलेश मोरे, भाग्यश्री पाटील यांच्या पथकाने केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!