शिरपूरजवळ मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.शिरपूर फाट्याजवळ उभ्या असलेल्या आयशर गाडीला भरधाव वेगाने येणाऱ्या ईको कारने पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात ईको कारमधील या अपघातात ईको कारमधील राधेश्याम ताराचंद किरडे (रा. कुमठाणा, ता. सेंधवा), मुन्नीबाई घाशीलाल रावत (रा. चारदड), तसेच सुनिल गमतीलाल आर्या, अनिल गमतीलाल आर्या, संजु उर्फ संजय गमतीलाल आर्या व कविता सुनिल आर्या (सर्व रा. चाचऱ्या, ता. सेंधवा) हे सहा जण गंभीर जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना महामार्ग अॅम्ब्युलन्सद्वारे शिरपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.दरम्यान,ईको कारचा चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. निष्काळजी व भरधाव वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी आयशर चालक ताहीरअली मोहम्मदमुन्ना (वय ४२, रा. बेगराजपुर, ता. खतौली, जि. मुजफ्फरनगर, उत्तरप्रदेश) यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ कुंदन पवार करीत आहे