हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अवैध गौण खनिज वाहतुक कारवाईदरम्यान महसूल पथकावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरपूर तहसील कार्यालयाच्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकावर जिवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना शनीवारी (दि ३१) सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील शहादा फाटा परिसरात घडली. या प्रकरणी हायवा वाहन चालकासह चौघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेप्रकरणी मंडळ अधिकारी महेंद्र पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.सदर तक्रारीनुसार महसूल मंडळ अधिकारी महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल अधिकारी रणजित जोगदंड, राहुल गुणवंते,एस.पी. महाजन,एन.एस.पटेल, जयेश राजपूत, महेश सावळे, गणेश बागुल, योगेश पाटील, रविकिरण माळी, विजय पवार तसेच महसूल सेवक विशाल कोळी हे पथक अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाईसाठी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गवर 31 जानेवारी रोजी सकाळी गस्तीवर असतांना चोपडा फाट्याकडून कळमसरे (ता. शिरपूर) दिशेने अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे पांढऱ्या व निळ्या रंगाचे हायवा वाहन (क्रमांक एम. एच. १८ / सी. डी. २७७७) थांबविण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित चालकाने पथकाच्या सदस्यांच्या अंगावर वाहन घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व वाहन चोपडा फाट्याच्या दिशेने पळवून नेले. पुढे चोपडा फाटा येथील भारत पेट्रोलियम पंपाजवळ हे वाहन थांबविण्यात आले.तेथे वाहनावरील अनोळखी चालकासह रोहित त्र्यंबक शेटे,विक्की चौधरी व अमोल शेटे यांनी महसूल पथकाशी हुज्जत घालून शिवीगाळ केली तसेच महसूल कर्मचारी महेश सावळे यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करत गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत सावळे यांचा शर्ट फाटला.तसेच संशयितांनी अरेरावीची भाषा वापरत शासकीय कामात अडथळा निर्माण करीत वाहन चालकास वाहनापुढे कोणी आल्यास त्यांच्या अंगावर वाहन घालण्यास चिथावणी देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून वाळूसह वाहन पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दाखल फिर्यादीवरून चालकासह चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!