हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाला उद्यापासून सुरवात

शिरपूर येथील २७४ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज संस्थानच्या वार्षिक यात्रोत्सवाला रविवारी (ता. १) माघ शुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. यात्रेसाठी संस्थानतर्फे सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, यंदाही भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभणार असल्याची माहिती अध्यक्ष कैलास धाकड यांनी दिली.रविवारी सकाळी नऊ वाजता माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते खंडेराव महाराजांची महाआरती होणार आहे. त्यानंतर नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या हस्ते यात्रेचे अधिकृत उद्घाटन करण्यात येईल. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार काशीराम पावरा असतील. यावेळी उपनगराध्यक्षा संगीता देवरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, बाजार समितीचे सभापती के. डी. पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अरुणावती नदीकाठावर या मंदिराची उभारणी केली असून, येथे खंडेराव महाराजांची भव्य अश्वारूढ मूर्ती आहे. खंडेराव बाबा विकास संस्थेमार्फत मंदिराचा कायापालट करण्यात आला असून, परिसरात विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत.
यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या पशूमेळाव्याचे उद्घाटनही रविवारी होणार आहे. उमदे अश्व आणि बैलजोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या बाजारात यंदा यात्रेपूर्वीच उत्तर प्रदेश, हरियाणा व पंजाब येथून नामांकित स्टड फार्मचे घोडे दाखल झाले असून, व्यापारी व खरेदीदारांची गर्दी वाढली आहे.
यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष कैलास धाकड, उपाध्यक्ष संजय आसापुरे, कोशाध्यक्ष किरण दलाल, कार्याध्यक्ष साहेबराव महाजन, सचिव गोपाल मारवाडी, विश्वस्त गुलाब भोई, श्रीहरी यादगिरीवार, गोपाल ठाकरे, शरदकुमार अग्रवाल, पुजारी मोरे कुटुंब व व्यवस्थापक महेश देवकर यांच्यासह सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!