हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तालुक्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट,शेती पिकांचे मोठे नुकसान

शिरपूर तालुक्यातील नागेश्वर परिसरात मंगळवार (दि. 27) रोजी दुपारी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह गारपीटीने शेतकऱ्यांच्या आशा उद्ध्वस्त केल्या. नागेश्वर बंगला, अजनाड, तरडी, हिसाळे आदी शिवारांमध्ये सायंकाळी चारच्या सुमारास वातावरणात झपाट्याने बदल झाला आणि काही मिनिटांतच वादळी वाऱ्यासह अवकाळी गारपीट सुरू झाली. निसर्गाच्या या कोपामुळे मका, रब्बी ज्वारी,हरभरा,केळी यांसारखी पिके अक्षरशः भुईसपाट झाली.तर रस्त्यावर अक्षरशः झाडे कोलमडून पडले.
शेतकऱ्यांनी कर्ज काढून, वाढत्या खत-बियाण्यांच्या किमती सहन करत, रात्रंदिवस राबून उभी केलेली पिके काही क्षणांत नष्ट झाली. गारपिटीच्या माऱ्याने मका व ज्वारी, हरभरे,केळी पपईची झाडे जमीनदोस्त झाली, अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आधीच अवकाळी पाऊस, बाजार भावातील चढउतार, वाढते कर्ज यामुळे शेतकरी अडचणीत असताना, या नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.काही शेतकऱ्यांच्या संपूर्ण शिवारात नुकसान झाले असून पुढील हंगाम कसा काढायचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!