हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तामथरे येथील श्रीकृष्ण राधा प्रेम मंदिरासाठी शिरपुरात महत्वपूर्ण बैठक

शिरपूर : शिंदखेडा तालुक्यातील तामथरे  येथे साकारत असलेल्या भव्य व दिव्य ‘श्री राधाकृष्ण प्रेम मंदिरा’च्या उभारणीला भक्तीमय दिशा देण्यासाठी दि. २४ जानेवारी २०२६ (शनिवार) रोजी शिरपूर येथे मंदिर बांधकाम समिती व भाविक भक्तांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सायंकाळी ४ वाजता शहरातील स्व. इंद्रसिंग भाऊसाहेब हॉल, वरझडी रोड, शिरपूर येथे होणार आहे.
ही बैठक श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थान, तामथरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून, परमपूज्य संत श्री महेंद्रजी महाराज यांच्या पावन अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होणार आहे. तसेच यावेळी उद्योजक श्री रविशेठ (सुरत, गुजरात) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
भगवान श्री राधाकृष्णांच्या प्रेम, भक्ती आणि अध्यात्माने ओतप्रोत असलेले हे मंदिर राज्यातील भक्ती, प्रेम व आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मंदिर उभारणीच्या पुढील टप्प्यांचे नियोजन, कार्यपद्धती तसेच भाविकांच्या सूचना व सहभाग यावर बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली.
या बैठकीसाठी शिरपूर तालुक्यासह परिसरातील सर्व भाविक भक्त, माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच युवा मित्र मंडळ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र कार्यात योगदान द्यावे, असे कळकळीचे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!