हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूर वरवाडे नगर परिषद विविध विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड

शिरपूर : शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या विविध विषय समितींच्या सभापतींची दि. 20 जानेवारी रोजी बिनविरोध निवड करण्यात झाली. सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी वासुदेव शंकर देवरे, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती शामकांत जगन्नाथ ईशी, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती डॉ.वृषाली अतुल बडगुजर, पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती गणेश केशव सावळे, महिला व बालकल्याण समिती सभापती अरूणा बापू थोरात यांची बिनविरोध निवड झाली.
माजी मंत्री आ.अमरिशभाई पटेल,आ.काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदासह 31 नगरसेवकांच्या जागा पटकावून एकहाती बहुमत मिळवले आहे. नगराध्यक्षपदी चिंतनभाई अमरिशभाई पटेल तर उपनगराध्यक्षपदी संगीता राजेंद्र देवरे यांची निवड यापूर्वीच झाली आहे.
शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या विषय समितींच्या सभापती व सदस्यांची निवड करण्यासाठी दि. 20 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता विशेष बैठक घेण्यात आली. पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे अध्यक्षस्थानी होते. सकाळी 11 ते दुपारी 1 या विहित वेळेत विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी जाहीर केले. त्यांना प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी,सागर कुलकर्णी यांनी सहकार्य केले.
विषय समितीनिहाय सभापती

स्थायी समिती : सभापतीपदी लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई अमरिशभाई पटेल (पदसिद्ध सभापती), सदस्य पदी माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपनगराध्यक्षा संगीता देवरे, वासुदेव देवरे, शामकांत ईशी, डॉ.वृषाली बडगुजर, गणेश सावळे, अरुणा थोरात, इरफान मिर्झा, हर्षल गिरासे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला.
———–
सार्वजनिक बांधकाम समिती :

सभापती वासुदेव शंकर देवरे,,सदस्य पदी राजकुमार सिसोदिया, रोहित रंधे,मनिषा पाटील, दिपक माळी, माधवराव पाटील, मिनाक्षी पाटील, प्रशांत चौधरी, अनिता गोसावी, मीराबाई कोळी.

——

शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती :

सभापती शामकांत जगन्नाथ ईशी, सदस्य पदी राजकुमार सिसोदिया, रोहित रंधे, मिनाक्षी पाटील, उमा पंडीत, गणेश साळुंके, राजेंद्र अग्रवाल, सुलोचना पाटील, रेहानाबी पटवे, आशिष पाटील.

                   ——–

स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती :

सभापती डॉ.वृषाली अतुल बडगुजर, सदस्य पदी अमृता महाजन, केतकी भोई, बाबुलाल महाजन, आशिष पाटील, अमोल राजपूत, वर्षा माळी, चंद्रकांत पाटील, गणेश साळुंके, अवेश शेख.

                      ——

पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती :

सभापती गणेश केशव सावळे, सदस्य पदी बाबुलाल महाजन, पूजा सोनार, चंद्रकांत पाटील, दिपक माळी, अमोल राजपूत, उमा पंडीत, राजेंद्र अग्रवाल, केतकी भोई, वर्षा माळी.

——–
नियोजन व विकास समिती :

सभापती संगीता राजेंद्र देवरे (पदसिद्ध सभापती), सदस्य पदी दीपक माळी, अवेश शेख, प्रतिभा भिल, अमृता महाजन, प्रशांत चौधरी, आशा माळी, शेख उजमा कुरेशी, अमोल राजपूत, माधवराव पाटील.

                    ———

महिला व बालकल्याण समिती :

सभापती अरूणा बापू थोरात, सदस्य पदी सुलोचना पाटील, रेहानाबी पटवे, उजमा कुरेशी, मिराबाई कोळी, अनिता गोसावी, प्रतिभा भिल, आशा माळी, पूजा सोनार, मनिषा पाटील.

सभापती व सदस्यपदांच्या निवडीनंतर उपनगराध्यक्षा संगीताताई देवरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.सागर कुलकर्णी यांनी आभार मानले.

 

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!