शिरपूर शहरातील निमझरी नाका परिसरात झालेल्या रस्ता अपघात प्रकरणी शिरपूर दिवाणी व न्यायदंधिकारी न्यायालयाने बलोनो कार चालकास १९ जानेवारी २०२६ दोषी ठरवून एक महिन्याचा कारावास व ६ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे
शहरातील निमझरी नाक्यावरील रॉयल बेकरीच्या मागील बाजूस,इस्त्री वाल्याच्या दुकानासमोर ३० मार्च २०१८ रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास एमएच १८ एजी ९३४५ क्रमांकाच्या मारुती सुझुकी बलोनो डेल्टा कारने समोरून येणाऱ्या १२ एनयु ७६०१ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला होता. या अपघातात दुचाकीस्वार निलेश वामनराव धाकड वय 41 रा. गणेश कॉलनी, निमझरी नाका हे गंभीर जखमी झाले होते.तर अपघातानंतर कार चालक मनोहर आसाराम सूर्यवंशी वय ४८, रा. पारोळा, जि. जळगाव, सध्या मुक्काम पुणे हा घटनास्थळावरून पळून गेला होता.
या प्रकरणी जखमीच्या पत्नी रिताबाई निलेश धाकड यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने अपघात व मोटरवाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार सी.एम. देवरे यांनी करून शिरपूर दिवाणी व न्यायदंधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.या प्रकरणाची सुनावणी शिरपूर दिवाणी व न्यायदंधिकारी न्यायालयाच्या न्यायमूर्ती पूजा नारायण कोकाटे यांच्या दालनात सुरू होती.या प्रकरणात सरकारी अभियोक्ता अवधूत भावसार यांनी प्रभावी युक्तिवाद केला.दरम्यान मनोह सूर्यवंशी याच्या विरुद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने सुनावणीनंतर न्यायमूर्ती पूजा नारायण कोकाटे यांनी आरोपी मनोहर आसाराम सूर्यवंशी यास एक महिन्याचा कारावास व ६ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.