हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

धुळे जात पडताळणी समितीतील लिपीक व प्रकल्प सहायक लाच घेतांना रंगेहाथ एसीबीच्या जाळ्यात

धुळे : जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयातील कनिष्ठ लिपीक प्रमोद पाटील व प्रकल्प सहायक इम्रान अन्सारी यांनी जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी स्वीकारतांना १९ जानेवारी रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांनी त्यांच्या शालकाचे ओबीसी (शालक) जातीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी दि. २१ जुलै २०२५ रोजी ऑनलाईन अर्ज सादर करून मूळ अर्ज व आवश्यक कागदपत्रे जिल्हा जात पडताळणी समिती, धुळे कार्यालयात जमा केली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीदरम्यान आवश्यक ती कागदपत्रे समितीकडे सादर करण्यात आली होती.मात्र,प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब होत असल्याने तक्रारदार सातत्याने कार्यालयात पाठपुरावा करीत होते.
या दरम्यान प्रकल्प सहायक इम्रान अन्सारी यांनी जात पडताळणीचे काम करून देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितली होती.त्यापैकी ३ हजार रुपये फोनपेच्या माध्यमातून स्वीकारण्यात आले. मात्र, सुमारे दोन महिने उलटूनही काम न झाल्याने तक्रारदार पुन्हा कार्यालयात गेले असता त्यांची कनिष्ठ लिपीक प्रमोद पाटील यांच्याशी भेट झाली.तेव्हा पाटील यांनी पैशांशिवाय काम होणार नसल्याचे सांगत १० हजार रुपयांची लाच मागितली.या प्रकाराबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात तक्रार दाखल केली.दि.८ जानेवारी रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत प्रकल्प सहायक इम्रान अन्सारी यांनी तडजोडीअंती ९ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने १९ जानेवारी रोजी जात पडताडणी कार्यालयात सापळा लावण्यात आला.दरम्यान रंगेहात लाच घेतांना ताब्यात घेतले तसेच कनिष्ठ लिपीक प्रमोद पाटील यांनी लाच देण्यास तक्रारदाराला अपप्रेरणा व प्रोत्साहन दिल्याचेही उघड झाले.या प्रकरणी दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे,पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल,पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे तसेच राजन कदम,मुकेश अहिरे,संतोष पावरा,प्रविण मोरे,रामदास बारेला,प्रशांत बागुल,मकरंद पाटील, प्रविण पाटील, जगदिश बडगुजर मपोकॉ रश्मी परदेशी यांच्या पथकाने केली आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!