हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूर येथील वृष्टी अग्रवाल हिने पटकावला जुनियर मिस इंडिया मिस टॅलेंटेड पुरस्कार

शिरपूर (प्रतिनिधी) राजस्थान येथील जयपूर येथे आयोजित ज्युनिअर मिस इंडिया राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत शिरपूर येथील वृष्टी भूपेश अग्रवाल हिने मिस टॅलेंटेड हा पुरस्कार पटकावून शिरपूरचा नावलौकिक केला.
याबाबत थोडक्यात वृत्त असे कि राजस्थान राज्यातील जयपूर येथे मिस इंडिया या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत भारताच्या विविध राज्यातून १७२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला होता या स्पर्धेत स्पर्धकांचे बाह्य सौंदर्य,बुद्धिमत्ता व विचारशक्ती,संवाद कौशल्य,आत्मविश्वास व व्यक्तिमत्त्व विकास, पोशाख व सादरीकरण, सामाजिक जाणीव व मूल्य,टॅलेंट आदी विविध मुद्द्यांवर घेण्यात आली. यावेळी या सर्व स्पर्धकातून वृष्टी भूपेश अग्रवाल हिने जूनियर मिस इंडिया_ मिस टॅलेंट हा मानाचा किताब मिळवला. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. ते शिरपूर येथील अमरीश भाई पटेल सीबीएससी शाळेची इयत्ता दहावीचे विद्यार्थ्यांनी आहे. ती शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे सचिव व शिरपूरची प्रख्यात व्यापारी फर्म मेसर्स ताराचंद मोतीलाल अँड कंपनीचे पार्टनर तसेच सामाजिक कार्यकर्ता   भूपेश अग्रवाल यांची मुलगी आहे. तिच्या या यशाबद्दल  आमदार अमरीशभाई पटेल आ. काशीराम दादा पावरा, प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल उपनगराध्यक्ष संगीताताई देवरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!