हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

ATM फोडीची थरारक मालिकांना शिरपूर पोलिसांचा मोठा ब्रेकथ्रू

महाराष्ट्रभर एटीएम फोडून बँकिंग व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या सराईत टोळीचा अखेर शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पहाटेच्या अंधारात सुरू असलेला थरार, तब्बल काही किलोमीटरचा पाठलाग आणि शेवटी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

17 जानेवारी 2026 रोजी पहाटे 2.15 वाजण्याच्या सुमारास, शिरपूर उपजिल्हा रुग्णालयासमोरील बँक ऑफ बडोदा एटीएम मशीनला लोखंडी साखळी बांधून पिकअप वाहनाच्या सहाय्याने ओढून फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी घटनास्थळा वरून पसार झाले.थोड्याच वेळात पित्रेश्वर स्टॉप परिसरात संशयास्पद पिकअप वाहन आढळले.पोलिसांना पाहताच आरोपींनी वाहन वेगात शहादा फाट्याकडे पलायन केले. यानंतर सुरू झाला अक्षरशः चित्रपटाला लाजवणारा पाठलाग.मुंबई- आग्रा महामार्गावर नाकाबंदी, बॅरिकेट्स तोडत, दहिवद गावात घुसून पुन्हा महामार्गावर येत आरोपींनी पोलिसांना चकवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पिकअपला बांधलेली 20 फूट लोखंडी साखळी रस्त्यावर घासत ठिणग्या उडवत होती, तरीही पोलिसांनी पाठलाग सोडला नाही.

Oplus_16908288

अखेर पोलिसांचा ससेमिरा सुटत नसल्याचे लक्षात येताच आरोपींनी चालत्या वाहनातून उड्या मारून पलायन केले.यानंतर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. अवघ्या काही तासांत पोलिसांनी टोळीचा माग काढत हेमंत सुकलाल माळी (वय 21), रा.भिरडई, धुळे आणि विदुर उर्फ विजय देवा जाधव (वय 40), रा.वसंतनगर,पारोळा, जळगाव यांना ताब्यात घेतले.

चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.आरोपींनी YouTube वर व्हिडिओ पाहून एटीएम फोडण्याचे धडे घेतल्याचे कबूल केले. शिरपूर, धुळे आणि अंमळनेर परिसरातील अनेक एटीएम फोडी या टोळीने केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन जप्त केले असून आरोपींवर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी पीएसआय संदिप दरवडे,आणि शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे पोहेकॉ रविंद्र आखडमल,राजेंद्र रोकडे, पोकॉ आरीफ तडवी,सचिन वाघ, जितेंद्र आहिरराव,योगेश दाभाडे, गोविंद कोळी, भटु साळुंके,विनोद आखडमल, मनोज महाजन, प्रशांत पवार, सोमा ठाकरे,मनोज दाभाडे व चा.पो.कॉ.रविंद्र महाले आदींनी केली आहे.

शिरपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे एटीएम फोडीच्या वाढत्या घटनांना मोठा आळा बसणार असल्याचे चित्र आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!