हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

विकास, विश्वास आणि नेतृत्वाचे प्रतीक-जयकुमार रावल

उत्तर महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जुळलेला, जनतेच्या विश्वासावर उभा राहिलेला आणि विकासाला ध्यास मानणारा नेता म्हणजे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल. राजकारण ही सेवा आहे, हा मंत्र मनाशी जपत त्यांनी आपल्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात जनतेच्या अपेक्षांना प्राधान्य दिले आहे.अवघ्या तरुण वयात राजकारणात प्रवेश करत त्यांनी जबाबदारीची जाणीव, अभ्यासू दृष्टिकोन आणि संवेदनशील नेतृत्व यांचा आदर्श घालून दिला. दोंडाईचा–शहादा मतदारसंघातून सलग पाच वेळा मिळालेला जनतेचा कौल हा त्यांच्या प्रामाणिक कार्याची आणि लोकांशी असलेल्या घट्ट नात्याची साक्ष देतो.
पद असो वा नसो, सत्ता असो वा नसो—जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव उभे राहणारे हे नेतृत्व आजही तितक्याच आपुलकीने सामान्य कार्यकर्त्याशी संवाद साधते. शेतकरी, युवक, महिला, व्यापारी, कष्टकरी,प्रत्येक घटकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.मंत्रीपदाच्या जबाबदारीतून राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान, शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय आणि आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीसाठी मांडलेली दूरदृष्टी ही त्यांच्या कार्याची ओळख आहे. यशाच्या प्रत्येक शिखरावरही त्यांनी साधेपणा, नम्रता आणि माणुसकी जपली हीच त्यांची खरी ताकद आहेजनतेच्या सेवेसाठी अखंड कार्यरत असलेले हे नेतृत्व अधिक ऊर्जेने, अधिक निर्धाराने समाजहितासाठी कार्यरत राहो, हीच मनःपूर्वक अपेक्षा.
लोकनेते नामदार जयकुमार रावल यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
आई जगदंबा चरणी त्यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी सार्वजनिक जीवनासाठी प्रार्थना.
संदीप जमादार
संपादक : दै. क्राईम ब्लास्ट
शिरपूर
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!