हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई!अवैध बिअर वाहतूक रोखली

धुळे जिल्ह्यातील मध्यप्रदेश सीमावर्ती भागात अवैध बिअर वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत ८ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. पी. मते हे हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर गस्त घालत असताना, त्यांना गुप्त बातमीदारामार्फत MH 46 BU 7158 क्रमांकाच्या वाहनातून अवैध बिअरची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून तालुक्यातील पळासनेर–मालवण रस्त्यावर हेदऱ्यापाडा शिवारात सापळा रचण्यात आला.
दरम्यान सदर वाहन येतांना आढळून आल्याने त्यास थांबवून तपासणी केली असता, प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भुसा भरून त्याखाली बिअरचे बॉक्स लपवून वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.या कारवाईत बडवायझर मॅग्नम तीव्र बिअर, पॉवर कुल स्ट्रॉंग बिअर ५०० मिलीचे ७० बॉक्स आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले या प्रकरणी वाहन चालक पद्माकर कमलाकर जाधव, रा. बोराडी यास अटक करण्यात आली असून त्याचा फरार साथीदार कमलेश पाटील उर्फ पिंटू पाटील याचा शोध सुरू आहे. दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. पी. मते जवान गोरख पाटील, प्रशांत बोरसे, एम. पी. म्हस्के, केतन जाधव,वाहन चालक निलेश मोरे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास अधीक्षक स्वाती काकडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान,अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!