हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

कोडीद येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष हिवाळी शिबिर उत्साहात सुरू

शिरपूर/कोडीद /- किसान विद्या प्रसारक संस्थेच्या कर्मवीर व्यंकटराव रणधीर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बोराडी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने “NOT ME BUT YOU” या ब्रीदवाक्याला अनुसरून कोडीद गावात सात दिवसीय निवासी विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे शिबिर न.पाडवी माध्यमिक विद्यालय,कोडीद येथे पूर्णतःनिवासी स्वरूपात पार पडत आहे.
शिबिराच्या कालावधीत कोडीद गाव व परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून, स्वयंसेवकांच्या श्रमदानातून स्वच्छता अभियान, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता व परिसर सौंदर्यीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. तसेच पथनाट्यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, स्वच्छता, आरोग्य, सामाजिक जबाबदारी यासारख्या विषयांवर जनजागृती करण्यात येत आहे.दररोज सकाळी प्रभातफेरीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात येत असून,यामुळे गावकऱ्यांमध्ये सकारात्मक जनजागृती निर्माण होत आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव,शिस्त, संघभावना सामाजिक बांधिलकी वाढीस लागत आहे.शिबिराच्या दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. व्यक्तिमत्त्व विकास, करिअर मार्गदर्शन, आरोग्यजागृती, नेतृत्वगुण विकास व सामाजिक जाणीव या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत आहे.
या शिबिराचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे विश्वस्त राहुल रंधे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून कोडीद गावाचे सरपंच प्रकाश पावरा, पोलीस पाटील भरत पावरा, माजी उपसरपंच गौतम सोनवणे, प्राचार्य डॉ. एस. एन. पटेल, डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. एम. व्ही. पाटील, प्रा. डॉ. चव्हाण, बी. डी. पाटील, डॉ. हिरा पावरा, सखाराम पावरा, शांतीलाल पावरा, नटराज पावरा आदी मान्यवर उपस्थित होते.शिबिराचे आयोजन प्राचार्य डॉ. उद्धव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली NSS कार्यक्रम अधिकारी दीपक पावरा, महिला कार्यक्रम अधिकारी सायंका पावरा व सहकारी प्राध्यापक व स्वयंसेवकांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दशरथ पावरा यांनी केले तर आभार महिला कार्यक्रम अधिकारी सायंका पावरा यांनी मानले.
एकूणच, हे सात दिवसीय निवासी विशेष हिवाळी शिबिर युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणारे, ग्रामीण विकासाला चालना देणारे व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरत असून “स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी” या तत्त्वाची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!