हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूर येथे 17 व 18 जानेवारी रोजी भव्यदिव्य धुळे ग्रंथोत्सव-2025 चे आयोजन

शिरपूर : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे व शिरपूर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे ग्रंथोत्सव–२०२५ या भव्य साहित्यिक उपक्रमाचे आयोजन आर. सी. पटेल फार्मसी कॅम्पस, शिरपूर येथे दि. १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले आहे.
ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून धुळे खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, नंदुरबार खासदार ॲड. गोवाल पाडवी यांच्यासह आमदार काशिराम दादा पावरा, किशोर दराडे, मंजुळाताई गावित, अनुप अग्रवाल, राघवेंद्र पाटील, सत्यजित तांबे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषद सीईओ अजीज करीम शेख, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
दि. १७ जानेवारी रोजी ग्रंथोत्सवाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार असून आर. सी. पटेल मेन बिल्डिंग येथून ग्रंथदिंडी निघणार आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होईल. सकाळी ११ वाजता मुख्य उद्घाटन कार्यक्रमानंतर धुळे जिल्ह्यातील आदर्श ग्रंथपाल व उत्कृष्ट वाचकांचा सत्कार तसेच पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.                                                                 दोन दिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी

“अहिल्याबाई होळकर” : इतिहास, साहित्य आणि लोककल्याणाचा आदर्श” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात प्रा. डॉ.सदाशिव सूर्यवंशी, प्रा.डॉ.बी.एन.पाटील व लेखिका दर्शना पवार सहभागी होणार असून अध्यक्षस्थान प्रा. डॉ. फुला बागुल भूषविणार आहेत. दुपारी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
दुसऱ्या दिवशी १८ जानेवारी रोजी सकाळी “एआय युगातील वाचन-सवय आणि समज” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यानंतर कथाकथन सत्र, बहुभाषिक कवी संमेलन “क-कवितेचा” तसेच समारोप सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील यांनी केले आहे. ग्रंथोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शिरपूर एज्युकेशन सोसायटी व ग्रंथोत्सव समन्वय समितीचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!