हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शहरात पतंगाच्या मांजाने ७ वर्षीय बालक गंभीर जखमी; धुळ्याला रेफर

शिरपूर : पतंगाच्या मांज्यामुळे घडलेल्या गंभीर घटनेत ७ वर्षीय बालक जखमी झाल्याची घटना आज रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे. राज आनंदसिंग पिंपळे (वय ०७, रा. वारुळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे) हा बालक आपल्या काका धनराज साहेबराव पिंपळे यांच्यासोबत मोटारसायकलने शिरपूरहून करवंदकडे जात असताना कृष्णा व्हॅली परिसरात त्याच्या गळ्याला पतंगाचा मांजा लागून तो गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर काका धनराज पिंपळे यांनी तात्काळ जखमी बालकास शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले असता गळ्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आल्याने अधिक उपचारासाठी त्यास धुळे येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील वार्डबॉय नितेश गवळी यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल लांबोळे यांच्या आदेशाने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकारामुळे पतंग उडवताना नायलॉन व काचलेपित मांज्याच्या वापरामुळे होणाऱ्या धोक्याबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून नागरिकांनी विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!