हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शहरातील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलातर्फे ॲम्बिशन क्रीडा महोत्सव दिमाखात व उत्साहात संपन्न

शिरपूर : शिरपूर एज्युकेशन सोसायटी व आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचालित माध्यमिक विभागामार्फत दि. 10 जानेवारी 2026 रोजी भव्यदिव्य स्वरुपात ॲम्बिशन क्रीडा महोत्सव आर.सी.पटेल फार्मसी कॉलेज ग्राउंड शिरपूर येथे दिमाखात व उत्साहात संपन्न झाला.
           शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते तसेच आमदार काशिराम दादा पावरा यांच्या अध्यक्षतेखाली ॲम्बिशन क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन हवेत बलून सोडून तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आले. धुळे जिल्हा पोलिस डिपार्टमेंट स्पोर्टस इन्चार्ज संजय एस. साळुंके यांच्या हस्ते मशाल रोहण करण्यात आले.
        यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी, पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, धुळे जिल्हा पोलिस डिपार्टमेंट स्पोर्टस इन्चार्ज संजय एस. साळुंके, गटविकास अधिकारी प्रदीप पवार, गटशिक्षणाधिकारी डॉ. निता सोनवणे, सचिव सौ. रेषा पटेल, विश्वस्त विजय भंडारी, सीईओ डॉ. उमेश शर्मा, स्पोर्टस डायरेक्टर प्रितेश पटेल, अकॅडमिक इन्चार्ज पी. व्ही. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
         आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातील सर्व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. हजारो खेळाडूंनी क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून क्रीडा नैपुण्य सिद्ध केले. 14 वर्षे आतील,17 वर्षेआतील,19 आतील मुले आणि मुली 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 600 मीटर, 1500 मीटर, 3 किलोमीटर धावणे, गोळा फेक, लांब उडी इत्यादी खेळ प्रकारातील क्रीडा स्पर्धेत संस्थांतर्गत शिरपूर, वाघाडी, गरताड, भोरखेडा या चारही क्लस्टर मधील सर्व माध्यमिक शाळांमधील खेळाडू सहभागी झाले.
       आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या भव्य मैदानाच्या हिरवळीवर क्रीडा महोत्सव उद्घाटन प्रसंगी “वीर भारतीय : भारताच्या महान वीरांचा गौरव” (भारताच्या गौरवशाली इतिहासातून युवकांना प्रेरणा) या विषयावर 14 माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर झाक्यांचे सादरीकरण केले. तसेच 21 माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक व मनमोहक रांगोळ्यांचे प्रदर्शन घडविले.
         कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी संस्थेतील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!