शिरपूर वरवाडे नगरपालिका कार्यालयात लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई अमरीशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 8 जानेवारी रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक व नगरसेविका पदांची निवड प्रक्रिया पार पडली. या सभेत सौ.संगिताताई राजेंद्र देवरे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले. तसेच स्वीकृत नगरसेविका म्हणून सौ. अमृताताई मनोज महाजन यांची, तर स्वीकृत नगरसेवक म्हणून माधवराव तुकाराम पाटील आणि प्रशांत बबनराव चौधरी यांची निवड करण्यात आली.या निवड प्रक्रियेदरम्यान सर्व पदांसाठी एकमताने निर्णय घेण्यात आल्याने सभेचे वातावरण उत्साही व सकारात्मक होते. नव्याने निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
या विशेष सभेस माजी नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत सरोदे, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नगरसेवक रोहित रंधे यांच्यासह अनेक विद्यमान नगरसेवक, नगरसेविका तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.