शिरपूर : येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या हिवाळी संस्कार शिबिराचे उद्घाटन दि. २ जानेवारी २०२६ रोजी मांडळ येथील महात्मा फुले चौकात करण्यात आले.सदर शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात एनएसएसच्या स्वयंसेविकांच्या स्वागत गीताने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर शिबिराचे उद्घाटक माजी सैनिक सुशील भटू सोनवणे, प्रमुख अतिथी माजी जि.प.उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी पं.स.सदस्य यतीश सोनवणे,सरपंच सौ.सीमा विशाल सोनवणे,माजी सरपंच सुनील भटू सोनवणे,उपसरपंच सुनील श्रावण सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य सौ.स्वाती जितेंद्र बागुल, पोलीस पाटील जितेंद्र झुलाल सोनवणे विराजमान होते. या उद्घाटन सोहळ्यासाठी तलाठी भीमराव बाविस्कर, ग्रामसेवक संतोष राठोड, मुख्याध्यापक डी.एस. धनगर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा), दिनेश माळी, विकास छगन बागुल, बाळू सीताराम बागुल, योगेश सोनवणे, पोपट नामदेव सोनवणे, जितेंद्र माळी, युवराज माळी, राजेंद्र अर्जुन सोनवणे, वनावल येथील ग्रामस्थ नंदलाल पाटील, पदवी विभाग प्रमुख डॉ. तुषार पटेल, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मनोज सोनवणे, मांडळ गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.