हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अस्तित्व’ वुमेन्स क्रिकेट चॅम्पियनशीपचे 18 ते 21 जानेवारी दरम्यान भव्य आयोजन

शिरपूर :- महिला व युवतींना क्रीडा क्षेत्रात समान संधी, आत्मविश्वास व नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट,एस.व्ही.के.एम.एन.एम. आय.एम.एस.तसेच शिरपूर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय ‘अस्तित्व’ वुमेन्स क्रिकेट चॅम्पियनशीपचे 18 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत भव्य आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या डायरेक्टर सौ.द्वेता करण नथवाणी यांच्या संकल्पनेतून साकारली असून, ग्रामीण व शहरी भागातील महिला आणि युवतींना क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील क्रीडागुणांना चालना देणे व संघभावना वाढविणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.या चार दिवशीय स्पर्धेचे उद्घाटन सोहळा रविवार,18 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता आर. सी.पटेल फार्मसी कॉलेज ग्राउंड, करवंद नाका, शिरपूर येथे होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, सौ. कृतीबेन भूपेशभाई पटेल व अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत.ही स्पर्धा 18 ते 21 जानेवारी दरम्यान शिरपूर शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील महिला क्रिकेट संघांमध्ये सामने रंगणार असून, या कालावधीत महिला क्रिकेटपटूंच्या कौशल्याचा, चिकाटीचा व संघभावनेचा प्रत्यय येणार आहे.                                                                                   गेल्या वर्षी या स्पर्धेत सुमारे 400 महिला व युवती क्रिकेटपटूंनी उत्साहात सहभाग नोंदवला होता.यंदाही मोठ्या संख्येने संघ सहभागी होणार असून, स्पर्धेला अधिक व्यापक व स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे.या वुमेन्स क्रिकेट चॅम्पियनशीपमध्ये प्रथम बक्षीस 71 हजार रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय बक्षीस 51 हजार रुपये रोख व ट्रॉफी, तृतीय बक्षीस 31 हजार रुपये व ट्रॉफी यासोबतच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, सामनावीर व मालिकावीर यांसाठी वैयक्तिक स्वरूपातील पारितोषिके, ट्रॉफी व प्रमाणपत्रे देऊन महिला क्रिकेटपटूंना सन्मानित करण्यात येणार आहे.
चार दिवसांच्या चुरशीच्या सामन्यांनंतर बुधवार, 21 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता आर. सी. पटेल फार्मसी ग्राउंड, करवंद नाका, शिरपूर येथे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.                                        अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून सौ. द्वेता करण नथवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी नियमितपणे वुमेन्स क्रिकेट चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे शिरपूर शहर व तालुक्यातील महिला व युवतींना आपली क्रीडा क्षमता दाखविण्याची, आत्मविश्वास वाढविण्याची व पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी तयार होण्याची संधी मिळत आहे.या स्पर्धेत मोठ्या संख्येने महिला व युवती यांनी 10 जानेवारी पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!