क्राइम ब्लास्ट ब्यूरो
आक्रोश मोर्चानंतर परत जाताना पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पाठीवर चाकूने वार करून जखमी केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी प्रमुख संशयित जगन सतीश भिल याच्यासह सात जणांना अटक केली.
१८ ऑगस्टला दुपारी शहरातील गुजराती कॉम्प्लेक्सच्या चौकात ही घटना घडली होती. वाहतूक अडवून धिंगाणा घालणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी गेलेले पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पाठीत चाकूने वार करण्यात आला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तसेच प्रत्यक्षदर्शिनी काढलेल्या व्हिडिओवरून संशयितांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यात प्रमुख संशयित जगन भिल (वय 19,रा.हाडाखेड), सागर जहागीलाल पावरा (वय 20), अनिल सीताराम पावरा (वय 20, दोघे रा.दहिवद), दिनेश रमेश पावरा (19, रा.बोराडी), राहुल संजय भिल (रा.19), कुणाल सुभाष भिल (वय 19, दोघे रा.सोनगीर) व सुनील लोटन सोनवणे (वय 23, रा.दहिवद) यांना अटक करण्यात आली.
त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी शिरपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व पुढील कारवाईबाबत सूचना दिल्या.