हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

आत्महत्या करणाऱ्या युवकाला पोलिसांचे जीवदान

तापीत आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणासाठी पोलिस ठरले देवदूत
क्राइम ब्लास्ट ब्यूरो
आत्महत्या करण्यासाठी सावळदे येथील तापी नदी पुलावर आलेल्या तरुणाचे प्राण वाचवत  खाकी मागील माणूसकी पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी व सहकाऱ्यांनी दाखवून दिली. त्यांच्या कार्यामुळे पोलीस प्रशासन खऱ्या अर्थाने “देवदूत” ठरले.
शिरपूर येथील एक तरुण नैराश्यातून आपले जिवन संपवण्यासाठी तापी नदी पुलावर आला होता.तापी पुलावरुन तरुणाने आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ करत व्हायरल केला,तापी पुलावरील स्वताचा फोटो स्टेटस ठेवला मित्रांना वॉट्सअप वर आत्महत्या करत असल्याचे मॅसेज केला. संपूर्ण मनाची तयारी त्याने केली होती. या घटनेची माहिती पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी याना मिळाली. त्यांनी समय सूचकता साधत लगेच त्यांची एक टीम तपास कामी तापी नदीवरील पुलावर काम करत असल्याचे लक्षात घेतले आणि त्यांच्या टीमला कळविले त्यांच्या टीमचे जवान HC प्रमोद ईशी व भटू साळुंखे यांनी व गावातील रहिवासी अशोक संजय कोळी यांनी क्षणाची पर्वा न करता तापी पुलावर उभा राहून उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या इसमास स्वतः चा जीव धोक्यात घालून पळत जाऊन  फिल्मी स्टाईलने पकडले.    मुलगा सुखरुप असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी याना कळवली. सदर इसमास पोलिस स्टेशनला नेण्यात आले. त्याला पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी विश्वासात घेत त्याची समजूत काढली.  होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव करून दिली. सदर युवक आई व आजीसोबत राहत असून घराचा आधार आहे.  त्याच्या कुटुंबीयांनी साश्रू नयनांनी पोलिसांचे आभार मानले.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!