क्राइम ब्लास्ट ब्यूरो
मिनी मंत्रालय म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्हा परिषद निवडणुका आता दृष्टीपथात आल्या आहे. धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी 14 जुलैला जि.प.गट आणि पंचायत समिती गणांच्या रचनेचा प्रारुप मसुदा जाहीर केला. त्यावर 21 जुलैपर्यंत हरकत घेता येणार आहे.
शिरपूर तालुक्यासाठी जिल्हा परिषदेचे 14 गट, पंचायत समितीचे 28 गण निश्चित करण्यात आले आहेत. जि.प. गटांमध्ये कोडीद, बोराडी, उमर्दा, सांगवी, रोहिणी, दहिवद, वाघाडी, विखरण बु, तर्हाडी त.त., वनावल, शिंगावे, थाळनेर, हिसाळे, भाटपुरा यांचा समावेश आहे.
पंचायत समितीच्या गणांमध्ये फत्तेपूर फॉरेस्ट, कोडीद, बोराडी, न्यू बोराडी, उमर्दा, पळासनेर, सांगवी, खंबाळे, आंबे, रोहिणी, दहिवद, हाडाखेड, वाघाडी, वाडी बु, अर्थे खुर्द, विखरण बु, जळोद, तर्हाडी त.त., वनावल, जातोडा, शिंगावे, करवंद, अहिल्यापूर, थाळनेर, अजनाड, हिसाळे, होळ, भाटपुरा यांचा समावेश आहे.